बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाह रे पठ्या! बजरंगने मिळवलं कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर एकहाती विजय

टोकियो | भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनियाने कांस्यपदक मिळवलं आहे. बजरंगजने कझाकिस्तानच्या पहिलवानाला एकही गुण मिळवून दिला नाही. 65 किलो वजनी गटात खेळणाऱ्या कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवकला 8-0 ने पराभूत केलं आहे.

पहिल्या राऊंडमध्ये बजरंग पुनियाला 2-0 अशी आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात बजरंगने आपले ठेवणीतले डाव टाकत सलग 6 गुणांची कमाई केली. बजरंगने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला एकही गुण मिळवून दिला नाही. बजरंगच्या पदकामुळे आता भारताने एकूण सहा गुणांची कमाई केली आहे.

बजरंगने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. 25 वर्षीय बजरंग जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. बजरंगचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता. त्याचा अझरबैजानचा हाजी अलीयेबने 12-7 ने पराभव केला होता.

दरम्यान, बजरंगचं सर्व देशभरातून कौतुक होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बजरंगचं कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या

वाह रे पठ्या! बजरंगने मिळवलं कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पहिलवानावर एकहाती विजय

खळबळजनक ! अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह मुंबईतील तीन रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी

पॉर्न पाहण्यासाठी पती टाकायचा दबाव, पत्नीने केलं असं काही की…

आनंदाची बातमी! कोरोना लढ्यात भारतामध्ये आणखी एका लसीला मान्यता, केंद्रीय आरोग्य मंत्र्याची घोषणा!

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More