बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अखेर अटक!

अहमदनगर | यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बाळ बोठेला हैद्राबादमधून अटक केली आहे. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं.

पोलिसांनी तातडीने 5 आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली तेव्हा या हत्याकांडात पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला.

दरम्यान, अखेर पोलिसांनी बाळ बोठेला हैद्राबाद येथून अटक केली आहे. तसेच सुपारी देऊन बोठे याने रेखा जरे यांची हत्या का केली हे आता अखेर समोर येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

कंगणा राणावतची आता थेट महात्मा गांधींवर टीका, म्हणाली…

रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात धू-धू धुतलं, पाहा व्हिडिओ

भर मैदानात वाॅशिंग्टन सुंदर आणि जाॅनी बेअरस्टो भिडले, अन्…

“आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”

“लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचं नियोजन करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More