मनसेचे नेते आंदोलन करायला गेले आणि आपापसातच भिडले!

मुंबई | मनसेच्या आंदोलनात मनसे नेत्यांमध्ये जुंपल्याचा प्रकार समोर आला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात हा प्रकार घडला. 

मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी महापालिकेच्या एल विभागीय कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलं होतं. मनसेच्या प्रमुख नेत्यांसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

याच कार्यालयातील कंत्राटदाराला मारहाण केल्यामुळे तुर्डेना तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यामुळे मनसेने विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा काढला होता.

अधिकाऱ्यांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी आवाज वाढवला. बाळा नांदगावकर यांनी त्यांना गप्प केलं. नांदगावकर यांच्या हस्तक्षेपामुळे संदीप देशपांडे चिडले आणि काही आंदोलनकर्त्यांसह ते निघून गेले. 

महत्त्वाच्या बातम्या-

-त्या तिथं पक्ष्यानं शी केलीय का?; काँग्रेस मीडिया सेल प्रमुखाच्या ट्विटनं खळबळ

2019 च्या आयपीएलमध्ये शिखर धवन खेळणार या संघाकडून?

-#MeToo | 100 कोटी दिले तर तू कुत्र्यासोबत संभोग करशील का?

-राज्यात भाजपला धक्का; आमदाराची आमदारकीच रद्द!

-सामन्यादरम्यान विराट आणि जडेजामध्ये लागली चेंडू पकडण्याची शर्यत!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या