बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय?”

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परीस्थितीत शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांमध्ये फक्त 100 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी, असे निर्देश दिले आहेत. यावरून भाजपपाठोपाठ आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेत शिवजयंती संदर्भातील नियमावली बदलण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत नियमावली बदलण्याचा इशारा दिला आहे. आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाहीतर काय टिपू सुलतानची साजरी करणार का? वेळीच ही नियमावली बदला, असं बाळा नांदगावकर म्हणालेत.

शिवजयंती हा आपला वर्षातील सर्वात मोठा सण आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय?. आजान स्पर्धा भरवता, बारची वेळ सारखी वाढवून देता, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली करता मग, शिवजयंतीला नियमावली का?, असा सवाल देखील बाळा नांदगावकर यांनी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून शिवजयंतीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यामध्ये प्रभात फेरी, बाइक रॅली मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसंच, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करुन 10 जणांच्या उपस्थित शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र भाजपच्या विरोधानंतर या नियमात बदल करत 100 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

‘या’ प्रसिद्ध मॉडेलची निघृण हत्या, मृतदेहासोबत केलं हे धक्कादायक कृत्य

पूजा चव्हाण प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचं अजब वक्तव्य, म्हणाले…

‘राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं’; केंद्रीय मंत्र्याच्या गांधींना सल्ला

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना आक्रमक; संजय राठोडांना दिले ‘हे’ सक्त आदेश

IPS कृष्णप्रकाश अ‌ॅक्शन मोडमध्ये, अवैध धंदे करणारांची आता खैर नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More