महाराष्ट्र मुंबई

“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”

मुंबई | राज्य सरकारकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. यावरून मनसे नेते बाळा नांदगावकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

ये पब्लिक सब जाणती है म्हणत नांदगावकरांनी राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढल्याचा सरकारचा निर्णय खुजेपणाचा असल्याची टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.

सरकार दरबारी जी कामे होत नाही किंवा ज्या विषयांना मतपेटीसाठी टाळलं जातं असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. त्यांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचं आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढवण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचं खुजेपण ठळकपणे दाखवणारा आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे ती नावं बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो”

“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला”

मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार- देवेंद्र फडणवीस

“महाविकास आघाडी सरकारला देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता खुपत आहे”

नाशिकमध्ये 13 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, आरोपींमध्ये एका मुलीचाही समावेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या