बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचं नियोजन करा”

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध घातले जात आहे. यावरुन मनसे नेते बाळा नांदगावकरांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

राज्य सरकारने सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये, त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

अनेक राज्यात जे आपल्या महाराष्ट्रापेक्षा अनेक अर्थाने मागे आहेत, तिथे मृत्यू दर हा अतिशय कमी आहे. हा ही सरकारसाठी संशोधनाचा विषय आहे. ते कमी चाचण्या करतात असे कारण देण्यापेक्षा आपल्या राज्यातील मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करावं. आधीच आर्थिकदृष्टया त्रस्त जनतेला लॉकडाऊन करून अडचणीत आणू नये, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद याशिवाय अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“नरेंद्र मोदी भगवान शंकराचा अवतार आहेत, त्यांनीच देशाला कोरोनापासून वाचवलं”

राज्यात कोरोनाचा उद्रेक; आजची आकडेवारीही अत्यंत धक्कादायक

’21 तारखेला जर परीक्षा झाली नाही तर…’; गोपीचंद पडळकरांंचा राज्य सरकारला इशारा

“राज्याचा अर्थसंकल्प फक्त पुण्याभोवती केंद्रीत, महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक”

व्वा पंत! रिषभचा जोफ्रा आर्चरच्या बॅालिंगवर जबरदस्त ‘रिव्हर्स स्वीप’, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More