बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाळा नांदगावकर मनसे सोडणार???, नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई | पुण्यातील मनसेच्या (MNS) धडाडीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. तर दुसरीकडे इतर जिल्ह्यात देखील मनसेला गळती लागल्याचं दिसतंय. अशातच आता मनसे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरे यांचे विश्वासू बाळा नांदगावकर मनसे सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

बाळा नांदगावकर मनसे सोडून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता खुद्द बाळा नांदगावकर यांनी समोर येऊन उत्तर दिलंय. शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चा या केवळ अफवा आहेत, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

मनसेच्या शिवडी गडाच्या कार्यालयाबाहेर उभा राहून मी आज तुम्हाला प्रतिक्रिया देत आहे. या सर्व चर्चा सोशल मीडियावर जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसेला मोठी खिंडार पडल्याचं दिसून येतंय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महापालिकेसाठी पक्षाचं काम सुरू केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

जेवणाच्या पंगतीत राज ठाकरे खुर्चीवर अन् कार्यकर्ते जमिनीवर; मनसेनं सांगितलं कारण

‘पाॅर्न पाहण्याच्या व्यसनामुळे मी उद्धवस्त झाले’; प्रसिद्ध राॅकस्टारचा धक्कादायक खुलासा

“सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांची वाट लावली”

“आम्ही आहोत म्हणूनच राज्यात सत्ता”, अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

पेराल तेच उगवेल! “विराटने त्याच्यासोबत असंच केलं होतं”; कोहली सोशल मीडियावर ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More