Top News

“आमच्या नादाला लागू नका, नाहीतर ‘मनसे दणका’ निश्चित आहे”

मुंबई | एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं. राजसाहेबांबद्दल हिन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. टीका कराल तर मनसे दणका निश्चित आहे. तो दणका कसा असतो हे त्या अबू आझमीला विचारा, असं म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खासदार इम्तियाज जलिल यांना लक्ष्य केलं आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आतापर्यंत मशिदीच्या भोंग्यांचा त्रास होत नव्हता का? एमआयएमने आजपर्यंत सर्वांनाच शिंगावर घेतलं आहे. त्यामुळे आम्ही मनसेलाच काय कोणालाही घाबरत नाही, असं म्हणत इम्तियाज जलिल यांनी टीका केली होती. यावरुन मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

चुकुन खासदारकीची लॉटरी लागलेल्यांनी लक्षात ठेवा, राज ठाकरेंच्या नादाला लागू नका, आताच सांगून ठेवतो, हवं तर अबू आझमीला जाऊन विचारा, असा इशारा नांदगावकर यांनी दिला आहे.

इंटरटेनर कोणाला म्हणता, खासदार असदुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये नाचले, त्यांना आम्ही नाचा म्हणू का? कृपया आमच्या नादाला लागू नका, नाहीतर फार महागात पडेल, असंही नांदगावकर म्हणाले आहेत.

 ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या