बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयुर्वेदाचार्य योगगुरू बालाजी तांबे यांचं निधन

पुणे | आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील खासगी रूग्णालयात त्यांना दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर बालाजी तांबे यांनी यांनी संशोधन केलं होतं. बालाजी तांबे यांनी ‘सकाळ’च्या फॅमिली डॉक्टर या पुरवणीच्या माध्यामातून अनेक लेख लिहिले होते. बाालाजी तांबे यांनी गेली पाच दशके आयुर्वेद, योग आणि संगीतोपचाराचा प्रसार केला. तांबे गुरूजांनी आयुर्वेदाचा फक्त देशातच नाही तर परदेशातही प्रसार केला. परदेशी नागरिकांनाही त्यांनी आयुर्वेदाचं महत्त्व समजावलं.

लोण्यावळ्यात कार्ला येथे ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाची जागृती केली. बालाजी तांबेंच्या या आश्रमाला अनेक राजकीय नेते, अभिनेते, संगीत, साहित्य आणि कला अशा विविध क्षेत्रातील लोल त्यांच्या आश्रमाला भेटी देतात.

दरम्यान, बालाजी तांबेंनी सुदृढ पीढीसाठी ‘गर्भसंस्कार’ पुस्तकाचं लेखन केलं होतं. या पुस्तकाच्या लाखोप्रती वाचकांनी घेतल्या होत्या. या पुस्तकाचं सहा भाषांमध्ये प्रकाशन करण्यात आलं होतं. बालाजी तांबेंच्य पश्चात्य पत्नी वीणा, मुलगा संजय आणि सुनिल आणि सून, नातवंडे असा परिवार आहे.

थोडक्यात बातम्या-

आयुर्वेदाचार्य योगगुरू बालाजी तांबे यांचं निधन

धक्कादायक! आता कोरोनापेक्षाही धोकादायक ‘या’ विषाणूचा शिरकाव

सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका, उमेदवारांचं गुन्हेगारी रेकाॅर्ड प्रसिध्द करण्याचा अवधी अवघा…

सुखद धक्का! नीरज चोप्राच्या सन्मानार्थ घेण्यात आला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

भाजपकडे ‘इतक्या’ हजार कोटींचं उत्पन्न; एका वर्षात तब्बल 50 टक्क्यांची वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More