बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकार मजुरांच्या मदतीला; रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला काम

मुंबई |   लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन प्रशासन वारंवार करत आहे. मात्र आता कोरोनाचा रिकव्हरी रेट चांगला वाढला असून आता लॉकडाऊनमध्ये शिथीलता येत आहे. दोन महिने घरात घरात बसून असलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून ठाकरे सरकार सरसावलं आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. मागेल त्याला काम देण्याच्या सुचना शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची 46 हजार 539 कामे सुरु असून त्यावर 5 लाख 92 हजार 525 मजुरांची उपस्थिती असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. ट्विट करून त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

कोरोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात आहे. त्याबाबतची काळजी प्रशासन घेत आहे तसंच मजुरांना देखील सुरक्षेची काळजी घेण्याबाबत सांगितलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

मला काश्मीरच्या संघाचा कर्णधार व्हायचंय- शाहिद आफ्रिदी

…पण तरीही भाजप नेत्यांना फक्त राज्यपालच दिसतात- बाळासाहेब थोरात

महत्वाच्या बातम्या-

‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले

लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More