महाराष्ट्र मुंबई

“संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान”

मुंबई | औरंगाबादच्या नामंतरावरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. औरंबादचं नाव बदलण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विरोध केला होता. त्यामुळे ठाकरे सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष मोठ्या पेचात पडला आहे. मात्र अशातच थोरातांनी यावर पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर या विषयावर चर्चा करण्याचं कारण नाही. महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान आहेत. आम्ही नामंतराराठीच्या आमच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या असल्याचं असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. आम्हाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. मात्र त्याबरोबर भाजपची विचारसरणी आणि कार्यपद्धती मान्य नाही. त्यामुळे आम्ही योग्य पद्धतीने चर्चा करुन निर्णय घेऊ आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेऊ, असंही थोरात म्हणाले. ठाण्यामध्ये ते बोलत होते.

दरम्यान, माझ्याकडे तीन महत्त्वाचे पदे आहेत. पक्षश्रेष्ठींना वाटले तर ते यात विभाजन करु शकता. मीसुद्धा त्यासाठी तयार असल्याचं थोरात म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांविरोधात राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन!

धक्कादायक! मुंबईमध्ये 19 वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार

नाद करा पण जडेजाचा कुठं! आपल्या रॉकेट थ्रोने शतकवीर स्मिथला दाखवला तंबुचा मार्ग; पाहा व्हिडीओ

कांगारूंच्या धरतीवर रोहित शर्माचं नाणं खणखणलंच; ‘हा’ विक्रम केला नावावर

“माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील असं मला वाटतं नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या