“बाळासाहेब म्हणायचे दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार”
मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षात यावरुन आरोपांची मालिका सुरु झाली आहे. अशातच आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरकारवर निशाणा साधल्याचं पहायला मिळालं.
नवाब मलिकांच्या प्रकरणात देशद्रोह आहे त्यामुळे यात एनआयए आहे. परदेशातील व्यवहार निघू शकतात, दाऊदच्या सांगण्यावरून काय काय झालं हे बाहेर येणार आहे, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांचे पिताश्री बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत मी खाली बसायचो. बाळासाहेब भाषण द्यायचे की दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार. आता दाऊदच्या जोडीतील एक माणूस उद्धव ठाकरेंचा जोडीदार आहे, अशा तिखट शब्दांत सोमय्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेवरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेक खलबतं सुरु आहेत. केंद्रीय यंत्रणांनाही निशाण्यावर धरल्याचं पहायला मिळतंय.
थोडक्यात बातम्या –
Russia-Ukraine War | “युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी”
Russia-Ukraine War | युक्रेनसोबत रशियाचा नेमका वाद काय?, वाचा सविस्तर
रशियन सैनिकांच्या निशाण्यावर युक्रेनच्या महिला; अत्यंत धक्कादायक माहिती समोर
Russia-Ukraine War | ‘इतके’ हजार भारतीय अडकल्यानं चिंतेचं सावट
रशियाकडून युक्रेन विमानतळावर बॉम्बफेक, लाईव्ह व्हिडीओ आला समोर
Comments are closed.