“निलंगा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे”

Sambhaji Patil Nilangekar

निलंगा | संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षात निलंगा शहरात आणि मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे. या काळात निलंगेकर यांनी शहराचे रूप पालटले आहे. त्यामुळे शहरातील जनता या निवडणुकीत पुन्हा एकदा संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांच्या पाठीशी उभी आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केले.

मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे- बाळासाहेब शिंगाडे

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या प्रचार सुरू आहे. यात दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत असे सांगून शिंगाडे म्हणाले की, निलंगा ही क वर्ग नगरपालिका असताना येथे आठवड्यातील सातही दिवस 24 तास पाणीपुरवठा होतो. राज्यातील ही अशी एकमेव नगरपालिका आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारी गटारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. निलंगेकर यांच्या नेतृत्वात सर्व जाती धर्मांसाठी सभागृहे व शादीखाना उपलब्ध आहे. शहरातील सामाजिक व जातीय एकोपा टिकण्यासाठी निलंगेकर यांनी प्रयत्न केलेले असल्याचे ते म्हणाले.

निलंगा शहराबाबत कोणी कसलाही दावा करू शकत नाही. शहरात झालेली विकास कामे निलंगेकर यांच्यामुळेच झाली आहेत. शहरातील जनतेसाठी निलंगेकर यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडविण्यासाठी काम केले. शहरातील रस्ते, गटारी, पथदिवे, कचरा या संदर्भात नियोजनपूर्वक कामे झाली. त्यामुळे शहरात आज मूलभूत सुविधा संदर्भात समस्या नाहीत. नागरिकांना वेळेवर पाणी मिळते. कुठेही कचरा साठून राहत नाही. रस्त्यावर पथदिवे असल्याने अंधार पडत नाही. यामुळे शहरातील जनता समाधानी आहे.

निलंगेकर जनतेसाठी सदैव उपलब्ध असतात- बाळासाहेब शिंगाडे

शिंगाडे यांनी सांगितले की, संभाजीराव पाटील निलंगेकर जनतेसाठी सदैव उपलब्ध असतात. एखाद्या कामासंदर्भात नागरिक निलंगेकर यांना थेट भेटू शकतात. विशेषतः शहरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना रोजगाराच्या शोधात पुण्या-मुंबईला जाण्याची गरज पडू नये याकडे निलंगेकर यांचे लक्ष असते, असे ते म्हणाले.

निलंगा शहराचा विकास करताना शहराचे रूप पालटण्याचे कामही निलंगेकर यांनी केल्याचे शिंगाडे म्हणाले. शहरात वृक्ष लागवड झाली तसेच अटल वॉक सारख्या अनोख्या योजना राबवून त्यांनी प्रेक्षणीय स्थळे निर्माण केली. या माध्यमातून विकसित शहर अशी निलंग्याची ओळख आता झाली आहे. यामुळे शहरातील जनता संभाजीराव पाटील यांच्या पाठीशी उभी आहे. या निवडणुकीत शहरातील नागरिक महायुती आणि भाजपचे अधिकृत उमेदवार संभाजीराव पाटील यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे. निलंगेकर यांचा विजय निश्चित असून यावेळी ते विजयाची हॅट्रिक करणार असल्याचंही बाळासाहेब शिंगाडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांचे फोटो वापरू नका, स्वतंत्र पक्ष म्हणून..; अजित पवारांना हायकोर्टाचे निर्देश

अजितदादांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात; खास व्हिडिओ केला शेअर

“सरकार स्थापनेसाठी शरद पवार आणि भाजपात..”; अजित पवारांचा महागौप्यस्फोट

गुड न्यूज! तब्बल 5 हजारांनी सोनं झालं स्वस्त?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

राणेंची पुन्हा दमदाटी, उद्धव ठाकरेंना कोकणात पाऊल ठेवण्यापूर्वीच दिलं ओपन चॅलेंज

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .