बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात

मुंबई |  शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीतरी आलबेल नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. अशातच यावर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मागील 5 वर्षात भाजपनं शिवसेनेला दिलेली वागणूक सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाणार नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. भाजप पक्षाने शासकीय यंत्रणांचा वापर करून दबावतंत्र अवलंबवलं आहे. त्याचा त्रास आमदारांना होत असल्याचं पाहायला मिळत असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.

या त्रासामुळेच आमदार प्रताप सरनाईकांनी आपली व्यथा मांडली आहे, असंही थोरातांनी सांगितलं. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधी पक्षांच्या मोट बांधण्याच्या विषयावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, भाजपला दूर ठेवण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचं काम शरद पवार यांनी याआधीही केलं आहे. ते संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचेही महत्वाचे घटक असल्याचं थोरात म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

चिंता वाढली! कोरोनाच्या घातक ठरलेल्या डेल्टा प्लस विषाणूचे या जिल्ह्यांत सापडले रूग्ण

बापमाणूस! लेकीच्या ‘ऑनलाईन क्लास’साठी मुसळधार पावसात छत्री घेऊन राहिला उभा

मोठी बातमी! ‘राज्यात 18 वर्षावरील सर्वांना मिळणार कोरोनाची लस’; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

हृदयद्रावक! कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्यावर मुलानं अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More