बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बालाजी तांबेंच्या ‘या’ तक्रारीमुळे बाळासाहेब ठाकरेंनी हातात घेतली होती काठी, वाचा थोडक्यात किस्सा!

पुणे | आपल्या आयुष्याची 50 वर्षे आयुर्वेद, संगीतोपचार, अध्यात्माचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य करणारे आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं आज वृद्धापकाळाने पुण्यात निधन झालं आहे. बालाजी तांबे यांचं कार्य महाराष्ट्रापुरतं न राहता जागतिक पातळीवर त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा गाढा स्नेह होता. बालाजी तांबे यांच्या आठवणी जागवल्या तर बाळासाहेब ठाकरेेे यांच्या सोबतचा किस्सा त्यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता.

बालाजी तांबे त्या काळात एमटीडीसीच्या बंगल्यात भाड्याने राहत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या बंगल्यावर मुक्काम केला होता. तेव्हा बाळासाहेबांना बंगल्याभोवती कचरा पडलेला दिसला. बाळासाहेबांनी तांबेंना याबद्दल विचारलं असता यावर बालाजी तांबेंनीं आपलं गाऱ्हाणं बाळासाहेबांसमोर मांडलं. मी त्यांना सर्व सांगितलं आहे. जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी असते. आम्ही स्वच्छतेवरच सर्व लक्ष्मी कमावली आहे, असं सांगून पण कोणी ऐकतच नाही असं बालाजी तांबेंनी बाळासाहेबांना सांगितलं होतं.

बाळासाहेबांनी हा सर्व प्रकार ऐकुन एक कडक काठी हातात घेतली आणि फर्मान सोडलं, ‘बोलवा रे त्या सर्व कर्मचाऱ्यांना’, बाळासाहेबांना पाहून बालाजी तांबेंनीं बाळासाहेबांना विचारलं तुमची युनियन आहे का इथे? त्यावर बाळासाहेब उत्तरले, माझी युनियन नाही, पण युनियनशिवाय कशी कामं होतात ते दाखवतो.

बाळासाहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांना सफाई करायला लावली आणि मी जाईपर्यंत इथं सर्व हिरवं झालं पाहिजे नाहीतर या काठीने एकेकाला दाखवतो, अशी तंबी सर्व कर्मचाऱ्यांना बाळासाहेबांनी दिली होती. हा किस्सा बालाजी तांबेंनीं एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.

थोडक्यात बातम्या –

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

“मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या ‘त्या’ प्रस्तावामुळेच आरक्षण रखडलं”

बार्सिलोना सोडल्यावर मेस्सी खेळणार ‘या’ क्लबकडून; कराराची रक्कम ऐकून व्हाल थक्क!

…तर आरक्षणाचं सर्व क्रेडिट केंद्र सरकारला देणार का?- प्रीतम मुंडे

“आता कळलं ठाकरे सरकारमधील ‘हे’ मंंत्री येड्या सारखं का बडबडतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More