बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे युतीमधून…”

मुंबई | राज्यात 2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून काडीमोड झाली. शिवसेना आणि भाजप युतीवरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत एक वक्तव्य करत गौप्यस्फोट केला आहे.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला होता तसंच त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णयही घेतला होता, असं वक्तव्य केलं आहे. दहा वर्षापुर्वीच त्यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची मानसिकता केली होती. राष्ट्रावादी सोबत आघाडीचा प्रस्ताव शिवसेनेकडून देण्यात आला होता, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी आम्ही काँग्रेससोबत असताना शिवसेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे, असा प्रस्ताव आल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं. मात्र, काही कारणामुळे ते जमले नाही. 2019 नंतर मात्र, राज्यात महाआघाडीचा प्रयोग झाला, असंही नवाब मलिकांनी सांगितलं. तसेच भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळालं होतं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्लीच्या सहकार्याने देेवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपविण्याचे प्रयत्न केले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र, त्यांना आता शिवसेना काय हे समजू लागल्यानंतर आता अशा प्रकारची वक्तव्य ते करत असल्याच नवाब मलिकांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी 25 वर्षे युतीत सडलो, असं वक्तव्य केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! फक्त 30 मिनिटात जमवले 10 लाख अन्…

सतत आजारी पडताय? मग आहारात करा ‘या’ तीन गोष्टींचा समावेश

राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट येणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

“…तर अजित पवार यांच्या घरात जाऊन आत्मदहन करू”

“लफडी करताना मला विचारलं होतं का?”; नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More