बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे वाघ होते, तुमच्यासारख्यांना ती उपमा देता येणार नाही”

सांगली | साठच्या दशकात शिवसेनेची स्थापना करून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा आवाज बनणारी शिवसेना आज सत्तेत आहे. आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनावर प्रभाव आहे. शिवसेनेच्या वाटचालीत बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. अशातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत शिवसेनेवर टीका केली आहे.

माझा महाराष्ट्र खरोखरच सोन्याचा आहे. तुमची महाविकास आघाडी धोक्यानं सत्तेत आली आणि महाराष्ट्राला लुटण्याचं काम करत आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद  पडळकर यानी केली आहे. महाराष्ट्रात फक्त एकच वाघ होते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे तुमच्यासारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी शिवसेना नेत्यांवर केली आहे.

मागील दोन वर्षात राज्याला अनेक वादळांनी धक्के दिले आहेत. राज्यात शेतकरी संकटात सापडला आहे. तरीही हे सरकार काहीच करत नाही, अशी टीका पडळकरांनी महाविकास आघाडीवर केली आहे. पडळकर हे सातत्यानं राज्य सरकारवर जहरी टीका करत असतात आताही त्यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला घेरण्याचं काम केलं आहे.

दरम्यान, पडळकर सांगली येथील झरे याठिकाणी बोलत होते. सरकार फक्त मदतीचे कागदी घोडे नाचवण्याचं काम करतं प्रत्यक्षात मदत मात्र करत नाही, असं पडळकर म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

IPL 2021चा चॅम्पियन कोण? फायनलमध्ये ‘या’ 8 खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना”

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

ट्विटरवर होतोय ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड’; तब्बल एवढ्या लोकांनी केलंय ट्विट

“आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More