बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेसोबत अफेअरच्या चर्चांवर अलायानं केला खुलासा, म्हणाली….

मुंबई | अभिनेत्री आलाया फर्निचरवाला अशा न्यू कमर्स अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांच्या अफेअरची खूप चर्चा होत आहे. आता चर्चा आहे की आलाया, बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरेला डेट करत आहे. या चर्चा अलायाने ऐश्वर्यच्या दुबईमध्ये पार पडलेल्या बर्थ-डे सेलिब्रेशनला हजेरी लावल्यामुळे सुरु झाल्या होत्या. आलयानं पहिल्यांदाच या चर्चांवर वक्तव्य केलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अलायानं तिच्या आणि ऐश्वर्य ठाकरेच्या नात्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. आता मी या चर्चेकडे फार लक्ष देत नाही. ऐश्वर्य माझा खूप चांगला मित्र आहे. तो खूप हुशार आहे. आमच्या दोघांबद्दल नेहमीच चर्चा सुरू असतात.त्यामुळे आमच्या घरच्यांनाही याची सवय झाली आहे, असं अलायनं म्हटलं आहे.

हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी माझ्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यावर बोलणे टाळते. मला असे वाटते की आपण दररोज एक माणूस म्हणून स्वत:ला कसे आणखी चांगले बनवू शकतो, याकडे लक्ष द्यायला हवे. लॉकडाउनमध्ये मी हेच केले आहे, असंही अलायानं म्हटलं.

दरम्यान, ऐश्वर्य एक कौटुंबिक मित्र आहे. आपण अनेक वर्षांपासून त्याला ओळखत असल्याचं अलाया म्हणाली होती. हे दोघेही एकत्र नृत्य व अभिनय क्लासेसला जात होते. हे पाहूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ALAYA F (@alayaf)

थोडक्यात बातम्या – 

…..अन्यथा ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरेल – डॉ. अजित नवले

“भाजपमधील काहीजणांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यातील एक पडळकर”

‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त?; आज एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, तर अवघ्या 25 नव्या बाधितांची नोंद 

निष्काळजीपणा! कामावर डॉक्टर न आल्यामुळे 12 कोरोना रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

अखेर त्याने करून दाखवलं! विदर्भाच्या तरुणाला मिळाली लंडनची स्कॉलरशिप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More