बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाची RSSला अडचण; वाद पेटण्याची शक्यता
मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून वाद चाललेला आहे. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरून महापालिकेला पत्र लिहिलं आहे. पत्रामुळं राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला लागूनच आरएसएसची जागा आहे. शिवाजी पार्कवरील बाळासाहेब स्मारकामुळे आरएसएसच्या शाखेला त्रास होत असल्याचं पत्रात नमुद करण्यात आलं आहे. आरएसएसच्या दादरमधील विभागानं पत्र लिहिलं आहे.
26 ऑक्टोबर 2021 रोजीचं पत्र आता समोर आलं आहे. परिणामी राज्यात वाद वाढण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आरएसएस हे हिंदूत्वाच्या मुद्द्यावर एकमेकांचे सहकारी होते. पार्कवरील स्मारकाचे विस्तारिकरण करण्यात येवू नये, अशी मागणी देखील पत्राद्वारे पालिकेला करण्यात आली आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढत असताना आता आरएसएसनं देखील वादात उडी घेतली असल्याची चर्चा आहे.
थोडक्यात बातम्या –
नवाब मलिकांना मोठा दणका! तब्बल आठ मालमत्तांवर ईडीची टाच
“राज यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र, ते कोणाचे…”, चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचं तोंडभरून कौतूक
राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…
रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर युक्रेनियन नौसैनिकांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता
Comments are closed.