विखेंना शह; काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरातांची निवड

मुंबई |  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. विखेंना काटशह देत बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

आमदार नसीम खान यांची विधानसभा उपनेतेपदी, बसवराज पाटील यांची प्रतोदपदी तर विधानसभेच्या प्रतोदपदी के.सी.पाडवी, सुनिल केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि यशोमती ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.

विधानसभेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे तर उपनेतेपदी रामहरी रूपनवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या प्रतोदपदी भाई जगताप यांची निवड झाली आहे.

दरम्यान, काँग्रेसने मोठे फेरबदल करत विधानसभेला थोरात आणि वडेट्टीवार यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

महत्वाच्या बातम्या

-हे शंकरा पाव रे…! आमच्या साहेबांना मंत्रीपद मिळू दे; ‘या’ आमदाराच्या समर्थकांचं देवाला साकडं

-शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मात्र भेटीने राष्ट्रवादीत अस्वस्थता

-भारतासाठी मोठी गुडन्यूज; ‘गब्बर’ संघात परततोय…!

-तुम्हाला देव माफ करणार नाही; पाणी प्रश्नावरून उदयराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

-…तर मी भाजप प्रदेशाध्यक्षपद स्विकारायला तयार- चंद्रकांत पाटील