बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने अन्नदात्याचा केलेला अपमानाला देश विसरणार नाही”

मुंबई | नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतीसंदर्भात लागू केलेले कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली होती. यावर देशभरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. या घोषणेनंतर अनेक नेत्यांनी शेतकऱ्याचं कौतुक केलं होतं. तर काहींनी मोदी सरकारवर टीकादेखील केली होती. आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, अन्नदात्याचा अपमान, आंदोलन मोडून काढण्यासाठी केलेली हिंसा आणि भाजपच्या क्रुरतेचा मोठ्या हिंमतीने सामना करून शेतकऱ्यांनी भाजप सरकारला गुडघे टेकायला लावले, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. शिवाय भाजपने अन्नदात्याचा केलेल्या अपमानाला देश विसरणार नाही. शेतकरी आणि जनता हिशोब चुकता करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. देशभरातून मोदी सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेत्यांनी मोदींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही मोदी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती. आता बाळासाहेब थोरात यांनीही यावर प्रतिक्रीया देत मोदी सरकारवर टीका केली आहे.

19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेसबुकवर लाईव्ह येत कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली होती. यावेळी मोदींनी कृषी कायदे रद्द करण्याचे कारण सांगताना “शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही 3 कृषी कायदे आणले होते.  देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करून आम्ही हे कायदे आणले होते. मात्र या कृषी कायद्यांना विरोध झाल्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात गेल्याने अखेर आम्ही हे कायदे रद्द करत आहोत” असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुलांना नाश्त्यासाठी ब्रेड आणि जाम देताय तर सावधान! ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

येरवडा कारागृहात आमदार चक्क चावला कैद्याला, जखमी कैदी रुग्णालयात दाखल

क्रांती रेडकरच्या ‘त्या’ कथित चॅटचे स्क्रिनशॉट नवाब मलिकांनी केले शेअर

“तेव्हा भाजप सत्तेत असती तर काश्मीर, जूनागढ, हैद्राबाद संस्थानांना पाकिस्तानला जा असं…”

“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More