Top News

“राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर भाष्य केलं होतं. याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार यांचं ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, पण ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तसेच राहुल गांधीच पक्षाचं समर्थपणे नेतृत्व करणार आहे असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिलं, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करतायत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपच्या यंत्रणा कार्यरत असतात, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

केवळ मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांची दुटप्पी भूमिका- देवेंद्र फडणवीस

राज ठाकरेंसोबत मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक!

“संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा शिवसेना तटस्थ, मग आता विरोध कसा?”

7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्वाचा आहे- बच्चू कडू

बच्चू कडूंनी केलेली मदत ‘तो’ विसरला नाही; न सांगताच केलं कौतुकास्पद काम!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या