बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक आणणार- बाळासाहेब थोरात

मुंबई | महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादाजी भुसे, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी राज्याच्या कृषी सुधारणा विधेयकावर सुमारे चर्चा केली. यानंतर बाळासाहेब थोरातांनी महत्वाची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारचे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

केंद्र सरकारने सुधारणेच्या नावाखाली आणलेले काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे आहेत. साध्या पॅन कार्ड वर कुठलाही व्यापारी शेतकऱ्याचा माल विकत घेऊ शकतो, यात जर फसवणूक झाली तर जबाबदारी कोण घेणार? या सर्वच गोष्टींचा विचार कृषी सुधारणा विधेयक तयार करताना आमच्या सरकारने केला आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

शरद पवार यांचे या क्षेत्रातील योगदान मोठे आहे. दहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी देशाचा कृषी विभाग सांभाळलेला आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. राज्यसरकारने सुचविलेल्या सुधारणांवर पवार साहेबांनी समाधान व्यक्त केले आणि अधिकच्या सूचनाही केल्या, अशी माहिती थोरातांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

घरात कोणाला कोरोना झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सुविधा

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, ‘या’ पिकांना होणार मोठा फायदा!

“कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच, कधीही येतो कधीही जातो”

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात कोरोना रूग्णसंख्येला उतरती कळा

“उद्धव ठाकरेंचं मोदींशी जमतं पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More