महाराष्ट्र मुंबई

चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात

मुंबई | चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे आहेत, असं महाराष्ट्राचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा सज्ज असून सतर्क आहेत. झाडं पडत आहेत, काही ठिकाणी घरांचे पत्रे उडत आहेत अशी स्थिती आहे. मात्र, संपूर्ण प्रशासन त्याचा सामना करण्यासाठी सतर्क आहे, थोरातांनी सांगितलं आहे.

मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, नियंत्रण कक्षाच्या प्रमुखांसोबतही मी चर्चा केली. हे वादळ जात असताना कोठेही जीवितहानी होऊ नये याची काळजी घेतली जात आहे, असंही थोरात यांनी सांगितलं आहे.

पुढील 2 ते 3 तास खूप महत्त्वाचे आहेत. ते वादळ कसं पुढे सरकतं आहे त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. हे वादळ मुंबईच्या जवळून जात असल्याने वेग वाढू शकतो, दिशा बदलू शकते अशा काही गोष्टी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना मोठ्या प्रमाणात सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत, असं थोरात म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

‘कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’; उद्धव ठाकरेंसाठी केजरीवालांचं ट्विट

सरकारच्या सूचनांचं पालन करा, बाहेर पडू नका; सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन

महत्वाच्या बातम्या-

“आप्पा… तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द”

‘या’ दोन माजी आमदारांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुढील सहा तासांत चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार- हवामान विभाग

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या