“वर्षा बंगल्यावर भरपूर चारापाणी आहे, तिथेच जनावरं नेऊन बांधा”

मुंबई | मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर चारा पाणी आहे, त्यामुळे जनावरं वर्षा बंगल्यावर नेऊन बांधा. तिथेच जनावरांची चांगली सोय होईल, असं म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी चारापाणी नसेल तर जनावरं पाहुण्यांकडं नेऊन बांधा, असा अजब सल्ला शेतकऱ्यांना दिला होता. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले पाहुणे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेच चारापाण्याची उत्तम सोय होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राम शिंदेच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला होता.

महत्वाच्या बातम्या-

-राहुल गांधींची ‘ती’ मुलाखत पेड न्यूज; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार…

धक्कादायक! राजस्थानमध्ये रस्त्यावर सापडलं मतदान यंत्र

-विराट कोहली मैदानात नृत्य करतो तेव्हा..

-योगी आदित्यनाथ हे तर अंगठाछाप- असदुद्दीन ओवैसी

“मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”