Top News महाराष्ट्र मुंबई

सामान्य माणसाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार हा काँग्रेसचा गाभा- बाळासाहेब थोरात

मुंबई | विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोलेंची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे राजकीय नेते नाना पटोलेंचे अभिनंदन करत शुभेच्छा देत आहेत. अशातच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही नानांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नाना पटोले यांचे यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यासोबतच नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्षांनाही मी शुभेच्छा देतो, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचा विचार हा शाश्वत आहे. पददलित आणि सामान्य माणसाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार हा काँग्रेसचा गाभा आहे. आजवर आम्ही प्रामाणिकपणे हा विचार जपला आणि वाढवला असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकार आणि संघटना दोन्ही पातळीवर काँग्रेस जनतेचा आवाज बनून काम करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असा विश्वासही थोरातांनी व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या

महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी देणंघेणं नाही- गिरीष महाजन

“सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”

श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट!

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण!

‘या’ माजी आमदाराचा भाजपला रामराम, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या