Top News

भाजप पक्ष नाही तर बकासूर आहे बकासूर- बाळासाहेब थोरात

नाशिक | भाजप हा राजकीय पक्ष नाही तर सत्तेची भूक असलेला बकासूर आहे. त्यांची भूक काही केल्या भागत नाही, असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपच्या या भूकेमुळं आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळं त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसेंसारखे नेते दु:खी आहेत. हेच दु:खी नेते लवकरच आमच्याकडे येतील, असा विश्वासही थोरातांनी व्यक्त केला आहे.

भाजपला सत्तेची हाव आहे. भाजपची प्रचार यंत्रणा पक्षप्रवेशाच्या खोट्या बातम्या पसरवत आहे, असा आरोपही थोरातांनी यावेळी केला.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत. लवकरच आघाडीतील महत्वाचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करतील, असा भूकंप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-माझा 30 वर्षांचा अनुभव मी पणाला लावणार पण…- अजित पवार

-कर्नाटकात अखेर कमळ फुललं! येडीयुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

-…म्हणून श्रीरंग बारणे यांचं पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-शरद पवार की बाळासाहेब… राजकारणातील आदर्श कोण?; सचिन अहिर म्हणतात…

-चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या