Top News महाराष्ट्र मुंबई

संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण?- बाळासाहेब थोरात

मुंबई |  कोरोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ या आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यभरातील भाजपाचे महत्वाचे नेते करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात ठाकरे सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत रस्त्यावर आले आहेत. याच भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेतला आहे.

संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण?, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपवर बाळासाहेब थोरात यांनी टीकस्त्र सोडलं आहे. राजकारणासाठी आयुष्य पडलंय, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे, इतिहास भाजपची ही काळी कृती कधीही विसरणार नाही, असं ते म्हणाले आहेत.

देशातील 20 टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पहायला मिळत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत असल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. फडणवीसांच्या या टीकेला देखील थोरातांनी उत्तर दिलं आहे.

चंद्रकांतदादांचे अंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्तेच मदतकार्य करत आहे. कायम राज्यपालांच्या आंगणात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा

आरबीआयचा पुन्हा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा

महत्वाच्या बातम्या-

मुंबईतले ठाकरे-फाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून माझं काय करणार- निलेश राणे

‘…ते आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत व्वा’; अमोल मिटकरींचा भाजपला टोला

गरिबांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या