महाराष्ट्र मुंबई

उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य नसून जंगलराज सुरु आहे- बाळासाहेब थोरात

मुंबई | उत्तर प्रदेशातील हाथरसच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचारही केले नाहीत. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून सर्वांची मान शरमेनं खाली घालायला लावणारी आहे, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते एशियाटिक लायब्ररी असा ‘संवेदना कँडल मार्च’ काढण्यात आला होता. यावेळी थोरात बोलत होते.

उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे राज्य नसून जंगलराज सुरु आहे. योगी आदित्यनाथांच्या कार्यकाळात गुन्हेगार मोकाट फिरत आहेत व आया बहिणींच्या अब्रूचे लचके तोडत आहेत. योगी सरकार या प्रकारणात काय दडवत आहे?,कुटुंबाला अंत्यसंस्कारही करू दिले नाहीत. कोणाला वाचवण्यासाठी हा आटापिटा सुरू आहे?, असा सवाल थोरातांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या!

श्रीदेवीच्या ‘त्या’ सुपरहिट गाण्यावर अनिल कपूरने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल!

‘नटीला सुरक्षा देणारे कुठे आहेत?’; आठवले मैदानात उतरून देणार उत्तर

‘संजय राऊत नाहीत तर मग कोणालाच संधी नाही’; संजय राऊतांचा प्रतिसाद, कामराचं आमंत्रण स्वीकारलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या