बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल गांधी म्हणतात तसं चौकीदार ही चोर है हेच सत्य आहे”

मुंबई | राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरु झाली आहे. मग भारतातच या व्यवहारावर पांघरुण घालण्याचं काम का केलं जात आहे. मोदी सरकार चौकशी करायला का घाबरत आहे आणि कोणाला वाचवण्यासाठी चौकशीपासून पळ काढला जात आहे, असा सवाल महसूलमंत्री व विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय.

राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणलं पाहिजे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसं चौकीदार ही चोर है हेच सत्य आहे, असं थोरात म्हणाले. राफेल घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही बाळासाहेब थोरात यांनी केली.

युपीए सरकारच्या काळातच 126 राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी 556 कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते. परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे 1670 कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला. तसेच मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा यासाठी या क्षेत्रातील काहीही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला याचे कंत्राट देण्यात आलं, असा आरोप थोरातांनी केलाय.

दरम्यान, संपूर्ण व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचे राहुल गांधी यांनी सांगितलं होतं परंतु त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे मोदी सरकारने दुर्लक्ष करुन हे प्रकरण गुंडाळलं, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

थोडक्यात बातम्या- 

“भाजपच्या काळात खनिजकर्म महामंडळामध्ये 43 हजार कोटींचा घोटाळा”

संजय राऊत-आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीवर नाना पटोले म्हणाले…

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

‘शरद पवारांनी केंद्राला कोणताही सल्ला दिलेला नाही, दिशाभूल करण्यात आली”

‘ते येतील तेव्हा भाजप विचार करेल’; राऊत-शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More