बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं तर बरं होईल”

मुंबई | मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा खेळ चालू आहे. कोरोनाच्या काळात ठाकरे सरकार हे निर्लज्जपणे राजकारण करत आहे. देशातील सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असा सल्ला केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी दिला होता. त्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पियूष गोयल यांना चांगलंच फटकारलं आहे.

पियूष गोयल महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असं सांगतात. आम्ही ऑक्सिजनची डिमांड कमी करावी, म्हणजे नक्की काय करावं, हे त्यांनी सांगावं. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आम्हाला कळलेला नाही. पियूष गोयल हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी राज्याला ऑक्सिजन कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी पियूष गोयल यांना दिला आहे.

पियूष गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं तर बरं होईल, आम्हाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. पण केंद्र सरकार आम्हाला अपेक्षित मदत करत नाही, असं  बाळासाहेब थोरात म्हणाले. ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात जाणं अयोग्य असल्याचंही थोरातांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवूनही ठाकरे सरकार कोरोनाविरुद्ध लढण्यात अपयशी ठरले, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रश्न असा आहे की, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवून केंद्र सरकार मेहरबानी करत आहे का? हा पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला ऑक्सिजनच्या नळकांड्या लावाव्या लागतील, असा कडक इशारा शिवसेनेने याआधी दिला होता.

थोडक्यात बातम्या-

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचं पालन अशक्य- अमित शहा

औरंगाबादेत PSI आणि महिला हवालदाराचं सूत जुळलं, पत्नीसोबत केलं लज्जास्पद कृत्य

महिलेवर 11 जणांनी केला बलात्कार, त्यानंतर समोर आली धक्कादायक माहिती

माणसातला देव! रोज 200 ते 300 टन ऑक्सिजन पुरवण्यासा सुरूवात

जेसीबीचा दात मानेत घुसला आणि… काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More