बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेला मालेगाव कोरोनामुक्तीचा पॅटर्न म्हणून समोर येतोय”

मालेगाव |  सुरूवातीला मालेगावातील वाढलेली रूग्णसंख्या ही राज्याच्या चिंतेची बाब वाटत होती, परंतु प्रशासकीय पातळीवरील आपआपसातील जबाबदारी वाटपाच्या सुत्रामुळे आज मालेगावचे चित्र सकारात्मकदृष्ट्या बदलले आहे व मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल म्हणून समोर येताना दिसतेय, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मालेगाव येथे केले.

संपूर्ण जग, देश, राज्य आणि नाशिक जिल्हा अडीच महिन्यांपासून कोरोना संकटाचा सामना करतोय. राज्यातील सर्वच ठिकाणी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले; काही संवेदनशील ठिकाणी विशेष काळजी घेतली गेली. त्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा समावेश होता.

नाशिक शहर व जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या लोकांमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येते. परंतु प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांना थेट घरी न पाठवता त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे, अशा प्रकारे प्रशासकीय पातळीवरील प्रयत्नांनुळे आज परिस्थिती नियंत्रणात आहे, असं थोरात म्हणाले.

प्रशासनाच्या कामाचं सकारात्मक दृश्याचे परिणाम मालेगांवात दिसून येत आहेत मालेगावात आज रूग्ण संख्या व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही कमी होताना दिसतेय, असेही यावेळी मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.

नाशिक शहर, ग्रामीण व मालेगावातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अतिशय जबाबदारीने हा कालखंड हताळला आहे. संकट अजून संपलेले नाही; अजूनही काळजीचा मोठा कालखंड समोर दिसतोय, सतर्क राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही सतर्कता कायम ठेवण्यात यावी. हे संकट लगेचच दूर होईल असे नाही, त्यासाठी लोकजागृती व स्वयंशिस्त आपल्याला कायम ठेवावी लागणार आहे, असंही थोरात म्हणाले.

अशा परिस्थितीत जनतेतल्या प्रत्येकाने आपण काय करायला हवे, याची जाणीव ठेवायला हवी. गेल्या अडीच महिन्यात लोकांना बरीच समज आलेली दिसून येते, लोकांनीही आता स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काळजीने वागण्याचे आवाहन यावेळी करताना शासन, प्रशासन कोरोनाच्या या युद्धात जनतेसोबत आहे, असं ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीस आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल- हसन मुश्रीफ

“मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवं”

महत्वाच्या बातम्या-

आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना हे मोदींच्‍या वर्षपूर्तीचं वैशिष्‍टय- सुधीर मुनगंटीवार

हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, तर…- गिरीश महाजन

ठाकरे सरकारचा दणका; विनाकारण भीती दाखवून अ‌ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More