Top News

‘देशाचे पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झाले आहेत’; थोरातांची नरेंद्र मोदींवर टीका

नागपूर | देशाचे पंतप्रधान सध्या भांडवलदारांचे गुलाम झाले आहेत, अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

नागपुरात आज काँग्रेसच्यावतीने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दराच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी थोरात बोलत होते.

आपल्या लहान मुलाबाळांसोबत कडाक्याच्या थंडीत सलग 52 दिवस आंदोलन करणं ही काही सोपी गोष्ट नाही. देशाचे पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झाले आहेत आणि देशाच्या शेतकऱ्यांनाही गुलाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण काँग्रेस तसं होऊ देणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मोठमोठे उद्योगपती कवडीमोल दरानं शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करतील आणि त्याचा हवातसा साठा करतील. कोट्यवधी कमवतील यात सर्वसामान्य शेतकऱ्याचा काय फायदा होणार?, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला.

थो़डक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी सोडलं मौन; म्हणाल्या…

त्या माझा आदर करतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, पण आदर दुरूनच करा- कृष्णा हेगडे

लस घेतली म्हणजे आता सर्व काही संपलं असं नाही- उद्धव ठाकरे

लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी अदर पुनावालांनी स्वत: घेतली लस; पाहा व्हिडीओ

…नाहीतर मीच पहिली लस घेतली असती- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या