Top News राजकारण

अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात

मुंबई | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचं बुधवारी 25 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.30 वाजता निधन झालंय. अहमद पटेल यांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनितीकार म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावले आहेत.”

“कायम स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यासाठी अहमद पटेल ओळखले जायचे. काँग्रेससाठी अहमद पटेल हे कायम निरपेक्ष सैनिकाच्या रुपात सज्ज असायचे. महाराष्ट्रातही विद्यमान महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आणि मार्गदर्शन,” असल्याचंही थोरात यांनी सांगितलं.

“माझे पटेल यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची व वैयक्तिक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे,” असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

फाशी दिली तरी स्विकारणार मात्र, ईडीच्या धाडीमुळे तोंड बंद करणार नाही- प्रताप सरनाईक

दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!

“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…”

काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला; राहुल गांधीची अहमद पटेल यांना श्रद्धांजली

ईडी हे त्यांच्या हातचं बाहुलं झालं आहे- छगन भुजबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या