महाराष्ट्र मुंबई

राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने लढवली ‘ही’ नवी शक्कल!

मुंबई | राज्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे काँग्रेस’ हे अभियान सुरु करण्यात आलं आहे. आगामी तीन महिने हे अभियान चालणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

अभियाना अंतर्गत गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी 40 हजार ग्राम काँग्रेस कमिट्यांची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच बुथ काँग्रेस कमिट्यांचे पुर्नगठण करण्यात येणार आहे. या अभियानाची जबाबदारी प्रदेश आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचं थोरात यांनी सांगितलं आहे.

टिळक भवन येथे आज बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची, महिला काँग्रेस, एनएसयुआय, तसेच सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

दरम्यान, बैठकीला प्रदेश कार्याध्यक्षा व महिला, बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुझफ्फर हुसेन, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक बातम्या-

…म्हणून उद्धव ठाकरेंची भेट न घेता अजित पवरांची भेट घेतली- शर्मिला ठाकरे

“…नाहीतर त्या लेखक गोयलला दाखवलं असतं राजेशाही काय असते”

शरद पवार हे ‘जाणता राजा’च आहेत; आव्हाडांच्या वक्तव्याचं सुशीलकुमार शिंदेंकडूनही समर्थन

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या