बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निर्मला सीतारामन यांची राहुल गांधींवर टीका; बाळासाहेब थोरातांचं चोख प्रत्युत्तर

मुंबई |  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधींवर टीका केली होती. त्या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे.

निर्मला सीतारामजी, राहुल गांधी मजुरांशी फक्त बोलून थांबले नाहीत तर त्यांच्या घरी जाण्याची देखील त्यांनी सोय केली. आम्हाला तुमच्या पक्षासारखी पी.आर. स्टंटची गरज पडत नाही, अशा शब्दात थोरात यांनी अर्थमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

रस्त्यावर बसून मजुरांशी गप्पा मारण्याची ही वेळ आहे का? असा सवाल अर्थमंत्र्यांनी राहुल गांधी यांना केला आहे. रस्त्यावर बसून गप्पा मारण्यापेक्षा त्यांच्या सुटकेस आणि बाळाला हातात उचलून घेऊन चालत गप्पा मारायला हव्या होत्या. फक्त गप्पा मारणं हे नाटक नाही का?, असं म्हणत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

दुसरीकडे आखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील अर्थमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मूकबधिर सरकारला मजुरांच्या प्रश्नांवर जागरुक करणं अपराध असेल तर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी वारंवार तो अपराध करतील. आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज तर नाहीत, त्यांना जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

संजय राऊत यांच्या ‘त्या’ मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; ट्विटरवरुन दिलं उत्तर

महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे असं दिसतंय- नितेश राणे

महत्वाच्या बातम्या-

मजूर आणि कामगारांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, ते आमची जबाबदारी- अरविंद केजरीवाल

उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा

‘मजुरांची हतबलता ड्रामेबाजी वाटते का तुम्हाला?’; सीतारमन यांच्या टीकेला रणदीप सुरजेवालांचं उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More