बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाळासाहेब थोरातांनी जाहीरपणे सांगावं की त्यांनी…’; विखे पाटलांचं थोरातांना आव्हान

अहमदनगर | राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील अंतर्गत वाद सर्वश्रूत आहे. त्यांच्यामधील राजकीय वाकयुद्ध सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यातील एका नेत्याच्या पापाचा घडा भरला असून कोणी किती महसूल गोळा केला आहे हे चौकशीत समोर येईल, असं बाळासाहेब थोरात यांना उद्देशून म्हटलं होतं. त्यावर आता बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं, की राधाकृष्ण विखे पाटील सत्तेत नसल्याने त्यांना नैराश्य आलं आहे. त्यांनी केलेल्या आरोपाकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.

त्यानंतर शनिवारी राधाकृष्ण विखे पाटलांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बाळासाहेब थोरात निराश वाटतात का हे मला कळत नाही. मी त्यांचे नाव नव्हतं घेतलं. त्यांनी त्यांच्या मनाला का लावून घेतलं आहे हे काही कळालं नाही, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी निराश होण्यापेक्षा त्यांनी जाहीरपणे सांगावे की त्यांनी बदल्यामध्ये पैसे घेतले नाहीत. व्यवहारात आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये पैसे घेतले नाहीत. तसेच त्यांचे कोणतेही कार्यकर्ते वाळू धंद्यात नाहीत, असं थोरात यांनी जाहीरपणे सांगावं. मी जे बोलतो ते त्यांना लागलं मला समजत नाही. सध्या चौकश्या सुरू आहेत, त्यातून सर्व काही समोर येईल, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मला विरोध करणाऱ्यांना जोड्यानं मारलं पाहिजे’; उदयनराजेंची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

‘तुझी मर्जी म्हणजे तुुझा अधिकार होऊ शकत नाही’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘हे आमदार, खासदार सो कॉल्ड जी माकडं आहेत…’, उद्यनराजे संतापले

“आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे”, मुख्यमंत्र्यांनी लगावला परमबीर सिंगांना टोला

‘आर्यन खानला गांजा दिला होता, पण….’, अनन्या पांडेचा मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More