महाराष्ट्र मुंबई

“पाच वर्ष मांडीला मांडी लावून सत्ता भोगली तेव्हा नामांतर आठवलं नाही का?”

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन ‘सामना’मधून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा आठवला नाही का?, असा सवाल थोरातांनी केलाय.

काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, मागील 5 वर्ष एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचं राजकारण करत आहेत, अशी टीका थोरातांनी केलीये.

मागील पाच वर्षांपासून सत्तेत असूनही औरंगाबाद नामांतरावर गप्प असणारा भाजप आज त्यावर राजकारण करत आहे. भाजपचा हा ढोंगीपणा सुरू आहे, असं थोरातांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”

शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन!

पोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला!

“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”

आरोग्य विभागात ‘इतक्या’ हजार पदांची भरती होणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या