देश

“आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?”

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील शेतकरी नेत्या सिताबाई तडवी या हरयाणा-राजस्थान सीमारेषेवर 26 जानेवारीपासून आंदोलनाला बसल्या होत्या.

सिताबाई तडवी यांचा जयपूर येथे मृत्यू झाला. आत्तापर्यंत जवळपास 60 शेतकऱ्यांचा आंदोलनकाळात मृत्यू झाला आहे. यावरून मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सीताबाई यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. तसेच केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा जीव घेणार?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलाय.

जयपूर स्टेशनला ट्रेनची प्रतीक्षा करत असताना अचानक सिताबाई तडवी यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी 5 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

“राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो, बाहेरही पडता येईना “

अखेर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

नव्या कृषी कायद्यांचा देशातील 10 कोटी छोटया शेतकऱ्यांना लाभ झाला- रामनाथ कोविंद

प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान दुर्दैवी- रामनाथ कोविंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या