मुंबई | आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्राचा संदर्भ दिला जातो आहे. तो संदर्भ देणाऱ्यांनी ते पत्र जरुर नीट वाचावं त्यावेळी शरद पवार यांनी ते पत्र शेतमालास योग्य किंमत मिळावी आणि जनतेला ती उत्पादनं स्वस्त मिळावीत या अनुषंगाने ते पत्र लिहिलं होतं, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस, वाद नाहीत आमचं सरकार पाच वर्षे चालणार आहे, त्यापुढेही चालणार आहे, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना लसीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच मोठं वक्तव्य, म्हणाले…
…तर जेलमध्ये राहणं पसंत करेन- ममता बॅनर्जीं
“राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले”
केवळ मोदींना विरोध करण्यासाठी सर्वांची दुटप्पी भूमिका- देवेंद्र फडणवीस
राज ठाकरेंसोबत मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक!
Comments are closed.