महाराष्ट्र मुंबई

“मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की होतीये”

मुंबई | संयुक्त किसान मोर्चाने 6 फेब्रुवारीला देशभर तीन तासांच्या चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस पक्षाचा या ‘चक्का जाम’ला पाठिंबा आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

कृषी कायदे मंजूर करवून घेताना संसदेत चर्चा केली नाही. विरोध तीव्र होत असताना आता मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचं केवळ नाटक करत आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

देशाचा अन्नदाता आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. पण केंद्रातील भाजपचे हुकूमशाही सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचं थोरात म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

आपल्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात- पंकजा मुंडे

“आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं ‘गरम रक्त’ सांडलं त्या गडकिल्ल्यांवर मुलांना न्यायला विसरू नका”

“‘रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजप नाही”

मायदेशातील कसोटीत पहिला बळी घेत बुमराहने केला श्रीगणेशा, पाहा व्हिडीओ

आर. आर. पाटलांच्या पोलिस बंधूंचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार; अजित पवार भावूक, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या