महाराष्ट्र मुंबई

“तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव”

मुंबई | मोदी सरकारने कामगार आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून आता तुमचा सातबारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे, अशी टीका महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर केली आहे.

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने आंदोलन पुकारलंय. या आंदोलनाला महाविकास आघाडीतील पक्षांनीही पाठिंबा दिला. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.

हे कायदे फक्त भांडवलदार, साठेबाज, नफेखोरांसाठी आहेत, ते रद्द झालेच पाहिजे ही आमची मागणी आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे, त्यासंदर्भात चर्चा सुरु असून लवकरच कायदा केला जाणार आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…तसा प्रयत्न केल्यास आम्ही शेतकऱ्यांचा मोर्चा रोखणार- विश्वास नांगरे पाटील

“शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रोहित पवार नक्कीच दुटप्पीपणा करत आहे आणि करत राहीन”

“राज्यातील सत्ताधारी आणि केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागेल”

आठवले माफी मागा!; शेतकरी आंदोलनावरील वक्तव्याने राष्ट्रवादी आक्रमक

शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं; रामदास आठवलेंचा सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या