बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक बाई उठते अन् तिला…”, बाळासाहेब थोरातांनी घेतला समाचार

नाशिक | देशाला स्वातंत्र्य (Freedom) मिळून आता 75 वर्षे झाली आहेत. तरी स्वातंत्र्य चळवळीवरून नेहमी वाद होत असतात. स्वातंत्र्य चळवळीत योगदानावरून सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा होत आहेत. अशातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) व्यासपिठावर पुन्हा एकदा स्वातंत्र्य चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. साहित्य संमेलनाच्या निरोपाच्या भाषणात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा रानौतचा (Actoar Kangana Ranuat) चांगलाच समाचार घेतला आहे.

कंगणा रानौतनं स्वातंत्र्य हे भीकेत मिळालं होतं असं वक्तव्य केलं होतं. यावरून तिच्यावर देशभरातून टीका झाली होती. आता साहित्य संमेलनाच्या मोठ्या व्यासपिठावरूनही कंगणाच्या वक्तव्यावर जोरदार टीका झाली आहे. कोणी तरी एक बाई उठते आणि स्वातंत्र्य चळवळीवर आघात करते. स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे, असं म्हणते तेव्हा आपण गप्प राहतो याचा खेद वाटतो, असं थोरात म्हणाले आहेत.

कंगणा रानौतच्या स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर कोणताही साहित्यिक बोलला नाही याचं वाईट वाटतं, असं बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटलं आहे. कंगणा रानौतच्या वक्तव्याला महाराष्ट्रातीलचं एक कलावंत समर्थन देतो यावरही आपण काही बोलत नाही, अशी खंत बाळासाहेब थोरात यांनी साहित्य संमेलनात बोलून दाखवली आहे.

दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोदावरीच्या सानिध्यात नाशिकमध्ये पार पडलं. अनेक कारणांनी हे संमेलन गाजलं. संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांनी या संमेलनाला घरूनच संबोधित केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

शिवेंद्रराजेंना धक्का! शरद पवारांच्या एका मताने शिवेंद्रराजेंचा पत्ता कट

‘कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर..’; रावसाहेब दानवेंचं विरोधकांना ओपन चॅलेंज

अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नातील ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात, पाहा व्हिडीओ

“मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?”

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी केंद्रीय मंत्री – नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More