पुणे | मंत्रिपद न मिळाल्यामुळे काहीजण नाराज असल्याची कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी खातेवाटपावर भाष्य केलं.
महाविकास आघाडीच्या खातेवाटपात काँग्रेसच्या वाट्याला फारशी महत्वाची खाती आलेली नाहीत. तसेच नेत्यांना मनासारखी खातीही मिळालेली नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी थोरातांनी पुढाकार घेतला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. काँग्रेसच्या वाट्याला 10 पालकमंत्रिपदं आली आहेत. त्यामुळे इतर मंत्र्यांना संधी मिळावी यासाठी थोरातांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नेत्यांची नाराजी बाहेर पडली. काहींनी तर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे नाराजांना शांत करण्याचं आव्हान पक्षाच्या वरिष्ठांसमोर आहे.
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल- https://t.co/CWknzhOk1D @AdvYashomatiINC @KiritSomaiya
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
“गुढीपाडव्याला महाराष्ट्रात नवं सरकार येईल” – https://t.co/exQZSlCfPN @SMungantiwar @BJP4Maharashtra @INCMaharashtra @ShivSena @NCPspeaks #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
…तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसेन; बच्चू कडूंचा इशारा-https://t.co/vvKBBsKSVi @RealBacchuKadu @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
Comments are closed.