महाराष्ट्र मुंबई

नामांतरावरुन राजकारण खेळू नका, संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत- बाळासाहेब थोरात

मुंबई | छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सीएमओला सुनावलं आहे.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये. सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचं भान बाळगावं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, असं थोरात म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिलं’; सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही- देवेंद्र फडणवीस

अहो दादा, असं मुघलांसारखं काय बोलता?- अमोल मिटकरी

“मुंबईकर टॅक्स भरत असले तरी ठाकरे सरकारला टक्केवारी मात्र बिल्डर देतात”

राज्य सरकारच्या ‘त्या’ चुकीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे- रावसाहेब दानवे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या