बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत- बाळासाहेब थोरात

अहमदनगर | शिवसेनेकडे असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष पद मिळाले तर त्याचा मला आनंद होईल. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि त्यांचं माझ्या नावावर एकमत झाल्याचं देखील मला समजलं आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. यावर काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत, असं मत व्यक्त करून विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याची ठाम भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. शनिवारी थोरात नगर दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनादरम्यान तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी उत्तम कामगिरी बजावली. पण म्हणून हे पद शिवसेनेला देण्यासंबंधित कोणताही विचार नाही किंवा चर्चाही नाही, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय.

आमच्या पक्षात सक्षमपणे काम करु शकणारे नेते आहेत. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होऊ शकलेली नाही… यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे… कोरोनाचं वातावरण निवळल्यानंतर ही निवडणूक घ्यावी लागणार आहे, असंही थोरात म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता”

मंगलकार्यालयात बॉयफ्रेंडचं लग्न सुरु, बाबू- बाबू म्हणत गर्लफ्रेंडचा गेटवर आक्रोश

‘रोज एक कॉफी प्यायल्यास…’; संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

“राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारण पूर्ण होत नाही”

“समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More