Top News

“कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी पडतो, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही”

नाशिक | कोरोनावर खर्च होत असल्यामुळे सरकारी तिजोरीतील निधी कमी पडतो. सध्या पैशांची आवकही कमी आहे आणि खर्च जास्त आहेत. त्यामुळे काही खात्यांना निधी कमी पडत असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

आमच्यात काही वाद नाहीत, काँग्रेस पक्षही कोणावर नाराज नाही, असं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी फेटाळून लावला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून काँग्रेस मंत्र्यांच्या खात्याला निधी मिळत नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलंय.

महत्वाच्या बातम्या-

“बावनकुळेंनी इतकंच भारी काम केलं तर मग त्यांचं तिकीट का कापलं?, हे कसले चौकीदार हे तर थकबाकीदार”

“तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू”

वीज ग्राहक आमचा देव आहे, त्यांचे आम्ही नुकसान करणार नाही- नितीन राऊत

…तर ठाकरे सरकार काय फक्त गोट्या खेळायला बसलंय का?- निलेश राणे

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट महागात पडेल- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या