Top News

केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत- बाळासाहेब थोरात

मुंबई | सप्टेंबर अखेर राज्याचे हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल 30 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत, ते तरी त्यांनी आधी द्यावेत, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

कोरोनामुळे महसूल कमी झाला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु असून परिस्थिती बदलल्यानंतर चित्र बदलेल. परंतु सद्यस्थितीत कर्ज काढावे लागत आहे. महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वात जास्त कर देते. पण राज्याला मात्र मदत करताना केंद्राकडून हात आखडता घेतला जातो, असं थोरतांनी सांगितलं.

राज्यातील भाजपाचे नेते मोठ्या मोठ्या मागण्या करत आहेत. पण केंद्र सरकारकडे असलेले जीएसटीचे 30 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळावेत, यासाठी प्रयत्न करत नाहीत, असंही थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

…तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद

“राज्याने केंद्राकडे कर्जाची मागणी केल्यास फडणवीसांनी ते मंजूर करून घ्यावं”

“105 आमदारांना घरी बसवून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यात काय दम आहे हे दाखवून दिलंय”

“मुख्यमंत्री माझे भाऊ, आमच्या नात्यात पक्ष बिक्ष येऊच शकत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या