संगमनेर | प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंंदुरीकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अनेकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इंदुरीकरांच्या वक्तव्यामुळे उफाळलेल्या वादावर भाष्य केलं आहे.
इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही. पण 25 वर्षात त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे अनेक चुकीच्या चालीरीती बंद झाल्या आहेत. ते चालवत असलेली शाळा असेल किंवा समाज प्रबोधन काम मात्र योग्यच आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी अप्रत्यक्षपणे इंदुरीकरांना पाठिंबा दिला आहे.
इंदुरीकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. या सगळ्यावर बोलाताना इंदुरीकर आणि माझी चांगली ओळख असल्याचं थोरातांनी सांगितलं.
पुत्रप्राप्तीसाठी ऑड इव्हनचा फॉर्म्युला सांगणाऱ्या इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचं भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी सांगितलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“एसआयटी चौकशीसाठी कायदेविषयक सल्ला घेणार”
फडणवीसांच्या #हिंमतअसेलतर आव्हानाची सोशल मीडियात उडवली जातेय खिल्ली
महत्वाच्या बातम्या-
“इंदुरीकरांच्या सांगण्यावरुन मला अनेकांनी धमक्या दिल्या”
तृप्ती देसाई तक्रार दाखल करण्यासाठी आज नगरमध्ये जाणार!
बारावीची परीक्षा आजपासून सुरु; राज्यभरातून 15 लाख विद्यार्थ्यी भविष्य आजमावणार
Comments are closed.