अहमदनगर महाराष्ट्र

“मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण न करता साथ दिली पाहिजे”

अहमदनगर | मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण करु नये, तर त्यांनी साथ दिली पाहिजे, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. ते अहमदगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना थोरातांनी अनेक विषयावर भाष्य केलं.

मराठा आरक्षणासंदर्भात पूर्णपणे काँग्रेस किंवा आघाडी सरकार योग्य ती काळजी घेत आहे. त्यामुळे यावर राजकारण करण्याऐवजी सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे, असं थोरातांनी म्हटलंय.

ज्यावेळेला त्यांचं सरकार होतं, त्यावेळेस आम्ही कोणतंही राजकारण केलं नाही. प्रत्येक गोष्टीत आमची साथ होती. आता त्यांनी देखील साथ दिली पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, कोरोना संकटात शेतकरी भरडला गेला आहे. तर शेतीमालाला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी हे शेतकऱ्याच्या दुःखावर डागण्यात आलं आहे, अशी टीका थोरातांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा”

आरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांना कोरोनाची लागण!

“मनमोहन सिंगांबद्दल फडणवीसांनी अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं”

‘रवी किशन स्वत: गांजाचे झुरके मारायचा’; या दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या